“क्राईम दुनिया”च्या माध्यमातून पटली मयत महिलेची ओळख

जळगाव : जळगाव तालुक्यातील आमोदा खुर्द ते घार्डी दरम्यान कोणत्यातरी वाहनाच्या धडकेत 75 वर्ष वयाच्या वृद्ध महिलेचे निधन झाले होते. 15 डिसेंबरच्या रात्री पावणे अकरा वाजेच्या सुमारास सदर घटना घडली होती. या प्रकरणी मयत वृद्ध महिलेची ओळख पटवण्याचे आवाहन क्राईम दुनियाच्या माध्यमातून करण्यात आले होते. परिणामी काही तासातच या बातमीच्या माध्यमातून फलश्रुती झाली व मयत वृद्ध महिलेची ओळख पटली. नजमाबी कादर खाटीक (खाटीक वाडा यावल) असे सदर महिलेचे नाव निष्पन्न झाले आहे.

यावल येथील दैनिक भास्करचे प्रतिनिधी शेख काबीज यांचे याकामी सहकार्य लाभले. क्राईम दुनियाच्या माध्यमातून प्रसारित झालेले वृत्त आणि फोटो बघून शेख काबीज यांनी सदर महिलेस ओळखले. त्यांनी लागलीच या बातमीत प्रसिद्ध झालेला फोटो खाटीक वाड्यातील रहिवासी नातेवाईकांना दाखवला. एकंदरीत ओळख पटल्यानंतर सदर महिलेच्या नातेवाईकांनी जळगाव तालुका पोलीस स्टेशनला धाव घेत ओळख पटवली. सदर महिला मनोरुग्ण असल्याची माहिती मिळाली असून ती कुठेही भटकंती करत असे. या प्रकरणी जळगाव तालुका पोलिस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद घेण्यात आली आहे. मृतदेहाची उत्तरीय तपासणी झाल्यानंतर तो नातेवाईकांच्या ताब्यात दिला जाणार आहे.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here