ट्रकच्या धडकेत एक ठार एक जखमी

जळगाव : जळगाव शहरातून जाणारा महामार्ग हा एक प्रकारे मृत्यूचा सापळा झाला असल्याचे दिसून येत आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून अपघातांच्या घटना बघता असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. महामार्गावरील चौपदरीकरणाचे आणि विविध उड्डाणपुलांचे काम पूर्ण झाल्याशिवाय अपघातांचे प्रमाण कमी होणार नसल्याचे म्हटले जात आहे.

आज दुपारी ट्रकच्या धडकेत दुचाकीवरील एक तरुण जागीच ठार व दुसरा जखमी झाला आहे. योगेश जगन्नाथ पाटील (इ – 40 एमआयडीसी जळगाव) व रवी धनंजय बोरसे (रामेश्वर कॉलनी जळगाव) हे दोघे कालिंका माता मंदिराकडून अजिंठा चौफुलीच्या दिशेने दुचाकीवर जात होते. त्यावेळी मागून आलेल्या ट्रकच्या धडकेत चालक योगेश पाटील जखमी आणि मागे बसलेला रवी बोरसे हा ठार झाला आहे. या प्रकरणी एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु असल्याचे समजते.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here