ट्रक – डंपरच्या धडकेत दोन ठार

जळगाव : भुसावळ शहरातून जाणाऱ्या महामार्गावर नाहाटा महाविद्यालयानजीक राजस्थान मार्बल जवळ फ्लाय ओव्हरब्रिज खाली आज ट्रक व डंपर या अवजड वाहनांचा भिषण अपघात झाला. या अपघातात दोघांचा मृत्यू तर एक जखमी झाला आहे. जखमीवर सामान्य रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

भुसावळ येथून जळगावच्या दिशेने रिकामा ट्रक (जिजे 02 झेडझेड 2922) निघाला होता. दरम्यान ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात असतांना पलीकडून येणाऱ्या डंपरला (एमएच 19 सीवाय 5327) जबर धडक बसली. या धडकेत डंपरचालक ज्ञानप्रताप मेवालाल पटेल (58) रा. उत्तरप्रदेश व ट्रक चालक अयुब हुसेन सिद्दीकी (गुजरात) हे दोघे ठार झाले. रिकाम्या ट्रकवरील सहचालक तौसिफ कुरेशी (गुजरात) हा जखमी झाला असून त्याच्यावर जळगाव सामान्य रुग्णालयात उपचार सुरु आहेत. याप्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here