अकस्मात मृत्यूच्या तपासाअंती महिलेविरुद्ध पतीच्या खूनाचा गुन्हा

काल्पनिक छायाचित्र

जळगाव : तब्बल वर्षभरानंतर अकस्मात मृत्यूच्या तपासाअंती भुसावळ बाजारपेठ पोलिस स्टेशनला महिलेविरुद्ध तिच्या पतीच्या खूनाचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

सीमा गणेश महाजन (46) रा. लक्ष्मीनारायण नगर भुसावळ असे पतीच्या खूनाचा आरोप असलेल्या महिलेचे नाव आहे. पती गणेश प्रभाकर महाजन (50) असे मयत पतीचे नाव आहे. सीमाने तिचा पती गणेश याचा दोरीने गळा आवळून खून केल्याच्या आरोपाखाली भुसावळ बाजारपेठ पोलिस स्टेशनला खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या घटनेप्रकरणी 4 ऑगस्ट 2020 रोजी अकस्मात मृत्यूची नोंद घेण्यात आली होती. वैद्यकीय अधिका-यांचा दाखला तसेच इतर पुरावे लक्षात घेत पोलीस नाईक संदेश निकम यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार सदर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. दारुचे व्यसन आणि घरगुती कलह असे या गुन्ह्यामागील कारण म्हटले जात आहे. पोलीस निरीक्षक दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरु आहे.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here