न्यायाधीशांच्या बंगल्यात चोरट्यांची “हात की सफाई”

धुळे : धुळे येथील न्यायाधीशांच्या बंद अवस्थेतील बंगल्यात चोरट्यांनी आपली “हाथ की सफाई” दाखवल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. धुळे शहर पोलिस स्टेशनच्या हद्दीतील भोलेबाबानगरात न्यायाधीश महोदयांचा बंगला कुलूपबंद असल्याचा फायदा चोरांनी घेतला. न्यायाधीशांचे कुटुंब बंगलाला कुलूप लावून बाहेरगावी गेल्याची संधी साधत केलेला चोरीचा प्रकार रविवारी सायंकाळी उघडकीस आला आहे.

सुज्ञ नागरिकांनी हा प्रकार पोलिसांना कळवल्यानंतर आलेल्या पोलिस अधिकारी व कर्मचारी वर्गाला बंगल्याचे कुलूप व कडी तुटलेल्या अवस्थेत दिसून आली. मात्र न्यायाधीशांचे कुटुंब हजर नसल्यामुळे नेमका चोरीचा ऐवज किती आहे हे समजू शकले नाही.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here