विवाहितेचा विनयभंग – चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

जळगाव : विवाहितेचा विनयभंग, मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी चौघांविरुद्ध एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भैरव भगवान राणे, प्रमिला भगवान राणे, उज्वला प्रदिप पाटील व प्रदिप पाटील (सर्व रा.जुना मेहरुण,गणपती मंदिरामागे,कासमवाडी जळगाव) अशी आरोप करण्यात आलेल्या व गुन्हा दाखल झालेल्या चौघांची नावे आहेत.

एमआयडीसी पोलीस स्टेशनला दाखल गुन्ह्यानुसार या घटनेतील विवाहिता दुपारच्या वेळी घरात एकटी होती. त्यावेळी घराबाहेर सुरु असलेली आरडाओरड बघण्यास ती बाहेर आली. त्यावेळी विवाहितेच्या मुलास भैरव राणे हा ओढाताण करत होता. मुलाची सोडवणूक करण्यासाठी विवाहिता धावत आली. विवाहिता समोर येताच भैरव राणे याने अश्लिल शिवीगाळ करत तिच्या मनाला लज्जा वाटेल असे कृत्य केले.विवाहितेच्या मुलाने मध्यस्ती करत तिचा बचाव केला. त्याचवेळी भैरवची आई प्रमिला भगवान राणे, बहीण उज्वला प्रदिप पाटील व उज्वलाचा पती प्रदिप पाटील यांनी विवाहितेला चापटाबुक्क्यांनी मारहाण करत शिवीगाळ केली. तुझ्याकडे साखरपुड्याचा कार्यक्रम कसा होतो ते आम्ही बघतो असा तिला दम दिला. या प्रकरणी विवाहितेच्या तक्रारीनुसार चौघांविरुद्ध एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सुरु आहे.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here