भुसावळ येथे मेणबत्ती कारखान्यास आग

जळगाव : भुसावळ येथील खडका रोड औद्योगिक वसाहत परिसरात असलेल्या मेणबत्ती कारखान्यास भल्या पहाटे  आगीची घटना उघडकीस आली आहे. सदर आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण अद्याप समजू शकले नाही. घटनास्थळी आगीचे लोळ दिसून आल्यानंतर परिसरात खळबळ माजली आहे.

आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी नगरपालिकेचे अग्निशमन बंब बोलावण्यात आले असून शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. या आगीमुळे कारखान्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. नेमकी किती प्रमाणात वित्तहानी झाली आहे याचा अंदाज आग आटोक्यात आल्यानंतरच होणार आहे.    

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here