जळगावात सोने चांदीच्या दागिन्यांची चोरी उघड – गुन्हा दाखल

जळगाव : जळगाव शहरातील सिंधी कॉलनी भागात सोने चांदीचे दागिने व रोख रकमेच्या चोरीची घटना उघड झाली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बळीराम पेठेत रेडीमेड कपड्याचे दुकान चालवणारे हरीष खियलदास रावलानी यांच्या सिंधी कॉलनी येथील जुन्या घरात हा चोरीचा प्रकार घडला आहे. हरीष रावलानी सध्या गणपती नगर भागातील अपार्टमेंट मध्ये राहण्यास गेले आहे. 10 जानेवारी रोजी सामान स्थलांतरीत करत असतांना रात्र झाल्यामुळे उर्वरित सामान त्यांनी सिंधी कॉलनी भागातील जुन्या घरातच राहू दिला. जुन्या घराला कुलूप लावून ते परिवारासह गणपती नगरातील नव्या घरी गेले होते. त्यानंतर 15 जानेवारीच्या सकाळी साडे आठ वाजता रावलानी यांनी सिंधी कॉलनी भागातील जुने घर गाठले असता चोरीची घटना उघडकीस आली. त्यांना घराच्या दरवाजाचा कडीकोंडा व कुलूप तुटलेले तसेच आतील सामान अस्ताव्यस्त आढळून आले.

पाहणीअंती पन्नास हजार रुपये किंमतीची 20 ग्रॅम वजनाची सोन्याची गळयातील चैन, एक हजार रुपये किमतीचे पायातील चांदीचे पायल, पाचशे रुपये किमतीची चांदीची अंगठी, रोख तीन हजार रुपये व आधार कार्ड चोरी झाल्याचे आढळले. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनास्थळी पो.नि. प्रत्ताप शिकारे यांनी भेट दिली. पुढील तपास सहायक फौजदार अतुल वंजारी व योगेश बारी करत आहेत.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here