नर्सवर अत्याचार – डॉक्टरची न्यायालयीन कोठडीत रवानगी

औरंगबाद : दवाखान्यात काम करणाऱ्या नर्सवर अत्याचार केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यात डॉक्टरची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. डॉ. प्रसाद संजय देशमुख (24) असे न्यायालयीन कोठडी सुनावलेल्या डॉक्टरचे नाव आहे. प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एस. एस. मांजरेकर यांनी याबाबतचे आदेश दिले आहेत.

औरंगाबाद शहरातील गजानन महाराज मंदिर परिसरात एका खासगी दवाखान्यात दोघे काम करत असतांना निर्माण झालेल्या ओळखीतून डॉ. प्रसाद देशमुख याने नर्ससोबत अत्याचार केल्याचा आरोप आहे. त्यासोबतच डॉक्टरच्या मावसभावाने देखील पिडीतेसोबत बळजबरी करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. मुकुंदवाडी पोलीस स्टेशनला याप्रक्रारणी गुन्हा दाखल असून पुढील तपास सुरु आहे.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here