मालेगावच्या वादग्रस्त व्हिडीओप्रकरणी चार्जशीट दाखल

काल्पनिक छायाचित्र

मालेगाव : दंगलीपूर्वी प्रक्षोभक वक्तव्य असलेला व्हिडीओ प्रसारित केल्याप्रकरणी किल्ला पोलिसांनी आरोपपत्र दाखल केले आहे. जियाऊर रहेमान जाविद अहमद व अम्मार शफिक अहमद अन्सारी या दोघा संशयितांचा त्यात समावेश आहे.

त्रिपुरा हिंसाचाराच्या निषेधार्थ 12 नोव्हेंबर रोजी पुकारण्यात आलेल्या बंद दरम्यान दगडाफेकीसह तोडफोड झाली होती. याप्रकरणी विविध कलमानुसार पाच गुन्ह्यांची नोंद झाली होती. त्यापैकी वादग्रस्त व्हिडीओ प्रकरणी दोन वेगळे गुन्हे दाखल झाले आहेत. त्यात चौघांना अटक झाली होती. या खटल्याची सुनावणी ण्या. पाठक यांच्यासमक्ष होणार आहे. दंगलीच्या घटनेतील रजा अकॅडमीचे अध्यक्ष डॉ. रईस रिझवी आणि सुन्नी जमियत उलमाचे पदाधिकारी युसूफ इलियास हे अद्याप फरार आहेत.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here