मालेगावला हॉस्पिटलच्या बंद खोलीत आढळली कवटी आणि हाडे

नाशिक : मालेगाव येथील मनपाच्या वाडिया हॉस्पिटलचे नुतनीकरण सुरु आहे. त्यामुळे जुन्या खोल्या तोडून नवीन बांधकाम सुरु आहे. जुन्या खोल्या तोडण्यापूर्वी तपासणी करत असतांना एका बंद अवस्थेतील खोलीत मानवी कवटी आणि काही हाडे गवसली आहेत.  

या घटनेप्रकरणी आयुक्तांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांना पोलिस स्टेशनला तक्रार दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत. वाडिया हॉस्पिटलच्या बंद खोलीत एक कवटी व केवळ एक हाड मिळून आले असल्याचे आरोग्य अधिकारी सपना ठाकरे यांनी म्हटले आहे. आहे. कवटीचा जबडा तुटलेला असून हाडाचे दोन्ही भाग देखील तुटलेले आहेत.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here