जबरी चोरीच्या गुन्हयातील मोबाईल विकत घेणारा जेरबंद

जळगाव : जबरी चोरीच्या गुन्ह्यातील मोबाईल बाळगणा-या तरुणास जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले आहे. जिल्हापेठ पोलीस स्टेशनला दाखल मोबाईल चोरीचा गुन्हा या माध्यमातून उघडकीस आला आहे. शिव कॉलनी भागातील रहिवासी हर्षल उर्फ मुन्ना चव्हाण असे अटकेतील तरुणाचे नाव आहे.

पो.नि. किरणकुमार बकाले याना समजलेल्या माहितीच्या आधारे गुन्हे शोध पथकातील पोहेकॉ विजयसिंग पाटील, जितेंद्र पाटील, सुधाकर अंभोरे, अकरम शेख, संदीप सावळे, पो.ना. नितीन बाविस्कर, राहुल पाटील, प्रीतम पाटील आदींनी या कारवाईत सहभाग घेतला. पथकाने केलेल्या कारवाईत शिव कॉलनी भागातील पारिजात संकुलानजीक राहणा-या हर्षल उर्फ मुन्ना धर्मेंद्र चव्हाण (21) यास ताब्यात घेण्यात आले. चौकशी व अंग झडतीदरम्यान त्याच्याकडून सॅमसंग गॅलेक्सी ए – 6 मॉडेलचा मोबाईल हस्तगत करण्यात आला.

सदर मोबाईल त्याने त्याचा परिचित नितीन दत्तु पाटील (रा.शिव कॉलनी जळगाव) याच्याकडून एक महिन्यापूर्वी विकत घेतल्याचे त्याने कबुल केले. मोबाईल व मोटार सायकलची जबरी चोरी करण्यात सराईत असलेल्या नितीन पाटील याच्याविरुद्ध जळगाव जिल्ह्यात विविध ठिकाणी गुन्हे दाखल आहेत.
हर्षल उर्फ मुन्ना धर्मेंद्र चव्हाण हा चोरीचा मोबाईल वापरात असतांना मिळून आल्याने त्याला ताब्यात घेण्यात आले असून पुढील कारवाईकामी जिल्हापेठ पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here