कन्नड घाटात वेगमर्यादेचे बंधन अन्यथा दंडात्मक कारवाई

जळगाव :  धुळे सोलापूर महामार्गावर असलेल्या घाटात अपघातावर नियंत्रण मिळवण्यासाठी आता वेगमार्यादेची मर्यादा घालण्यात आली आहे. चारचाकी वाहनांसाठी ताशी ७४ तर दुचाकी व अवजड वाहनांसाठी ६३ किमी वेगाची मर्यादा राहणार आहे. या वेगमर्यादेचे उल्लंघन केल्यास दोन हजार रुपयांची दंडात्मक कारवाई केली जात आहे.  

वाहनांच्या भरधाव वेगाला आळा घालण्यासाठी आता इंटरसेप्टर कारची सोय‎करण्यात आली आहे. यामुळे वेगमर्यादेचे उल्लंघन करणा-या वाहनांवर कारवाई करण्याचे काम सोपे झाले आहे. मात्र असे असले तरी वाहनधारक या कारवाईच्या नियमापासून अनभिज्ञ आहेत. वेगावर नियंत्रण ठेवण्यासह दंडात्मक कारवाईबाबत वाहनधारकांना अद्याप माहिती नाही. तसेच याबाबत तसा माहितीपर फलक देखील कुठे लावण्यात आलेला नाही. महामार्ग प्राधिकरणाने याबाबत दखल घेण्याची मागणी होत आहे.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here