हायफाय चोरट्यांनी लांबवला आठ लाख रुपयांचा माल

जळगाव : भुसावळ शहरातून जाणा-या महामार्गावरील शिवपूर कन्हाळा रस्त्यावर असलेल्या समर्थ अपार्टमेंटमधील बंद घरातून 2 लाखाची रोकड व दागिने असा एकूण आठ लाख रुपयांचा ऐवज सुटबूट घातलेल्या कारमधून आलेल्या हायफाय चोरट्यांनी लंपास केला. भर दुपारी घडलेल्या या घटनेने रहिवाशांची सुरक्षा धोक्यात आली असल्याचे म्हटले जात आहे.

या अपार्टमेंट मधील रघुनाथ चौधरी यांच्या परिवारातील सदस्य शनिवार 22 जानेवारी रोजी श्री क्षेत्र शिरसाळा येथे देवदर्शनासाठी गेले होते. घरातील सून कुलूप लावून जवळच राहणा-या नातेवाईकांच्या घरी गेली होती. दरम्यान कारमधून चोरटे आले. कुणाकडे तरी नातेवाईक आले असावे असा समज परिसरातील लोकांनी करत त्यांच्याकडे दुर्लक्ष केले. सुटाबुटात आलेल्या चोरट्यांनी चौधरी यांच्या बंद घराचे कुलूप तोडून कपाटात ठेवलेली दोन लाख रुपयांची रोकड व दागिने असा एकूण आठ लाख रुपयांचा मुद्देमाल चोरुन नेला. डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे, बाजारपेठ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड, स.पो.नि. हरीष भोये आदी तपास करत आहेत.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here