जालन्याची बेपत्ता बालिका गवसली जळगावला

जळगाव : जालना येथून बेपत्ता झालेली सात वर्षाची बालिका जळगाव रेल्वे स्टेशनवर मिळाल्याने तिच्या आईवडीलांचा जीव भांड्यात पडला आहे. जळगाव पोलिसांच्या मदतीने जालना पोलिसांमार्फत या बालिकेला तिच्या पालकांकडे सुखरुप सुपुर्द करण्यात आले आहे.

जालना रेल्वे स्टेशन परिसरातून सदर सात वर्षाची बालिका बेपत्ता झाली होती. याप्रकरणी कदीम पोलिसांकडे तक्रार देण्यात आली होती. दुकानातून सामान विकत घेण्यासाठी बालिकेच्या आईने तिला दुकानात रवाना केले होते. त्यानंतर ती बालीका बेपत्ता झाली व घरी आलीच नाही. सिसीटीव्ही फुटेज तपासणीनंतर देखील ती बालिका कुठेही आढळून आली नाही. पोलिसांनी या बालिकेचे फोटो व माहिती सर्व पोलिस स्टेशनला पाठवली. तपासाअंती ती बालिका जळगाव रेल्वे स्टेशन परिसरात असल्याची माहिती तपास अधिकारी उप निरिक्षक मरळ यांना समजली. त्यांनी जळगाव पोलिसांच्या मदतीने त्या बालिकेला ताब्यात घेत पुढील कायदेशीर प्रक्रिया राबवली. पोलिस अधीक्षक विनायक‎ देशमुख, अपर पोलिस अधीक्षक‎ विक्रांत देशमुख, डीवायएसपी नीरज‎ राजगुरू, सहायक पोलिस निरीक्षक‎ महेश टाक यांच्या मार्गदर्शनाखाली‎ पीएसआय मरळ यांनी या बालिकेचा शोध घेत तिला तिच्या पालकांच्या हवाली केले.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here