सासूच्या मारेकरी सुनेला तीन दिवस पोलिस कोठडी

यवतमाळ : सुनेने चोरीच्या रिव्हॉल्व्हरने सासूची हत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी सुनेला तिन दिवस पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. गेल्या काही वर्षापासून सासुच्या होणा-या त्रासाला वैतागून सुनेने हा प्रकार केला आहे. जवळच राहणा-या सैनिकाच्या घरातून रिव्हॉल्व्हर चोरी केले असल्याची कबुली सुनेने पोलिसांना दिली आहे. सरोज पोरजवार असे सुनेचे तर आशा पोरजवार असे मयत सासूचे नाव आहे.

अटकेतील सुनेकडून रिव्हॉल्व्हरसह जिवंत काडतुस जप्त करण्यात आले आहे. सुमारे तेरा वर्षापुर्वी अरविंद आणि सरोज यांचा विवाह झाला होत. त्यांना एक मुलगी देखील आहे. गेल्या काही वर्षापासून सासू व सुनेचे काही जमत नव्हते. त्यातून हा प्रकार घडला असल्याचे सुन सरोज हिने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार समजते.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here