पाचोरा येथे राष्ट्रीय मतदार दिन उत्साहात

जळगाव : पाचोरा महसूल विभाग, उपविभागीय अधिकारी तथा मतदान नोंदणी अधिकारी कार्यालयाच्या वतीने पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित शेठ मुरलीधरजी मानसिंगका महाविद्यालयात “राष्ट्रीय मतदार दिन” उत्साहात झाला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपविभागीय अधिकारी डॉ. विक्रम बांदल तर प्रमुख उपस्थितांमध्ये तहसिलदार कैलास चावडे, निवासी नायब तहसीलदार संभाजी पाटील, कॉंग्रेसचे तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी, एम. एम. महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. वासुदेव वले तसेच महाविद्यालयाचे प्राध्यापक आदी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक निवासी नायब तहसिलदार संभाजी पाटील यांनी तर केले. तहसिलदार कैलास चावडे व प्राचार्य प्रा. डॉ. वासुदेव वले यांना मतदानाचे महत्व उपस्थित विद्यार्थीवर्गाला कथन केले. भविष्यात होवु घातलेल्या निवडणुकांमध्ये विद्यार्थ्यांचा सहभाग मोलाचा ठरणार आहे. मतदानाचा पहिला हक्क बजावणाऱ्या सहीष्णा सचिन सोमवंशी, आचल नंदु सोमवंशी यांच्यासह युवक व युवतींना नवीन मतदान कार्ड उपविभागीय अधिकारी डॉ. बांदल याच्यां हस्ते देऊन सन्मानित करण्यात आले. मतदार दिनानिमित्त आयोजित रांगोळी व निबंध स्पर्धेतील समाविष्ट विद्यार्थ्यांचा तसेच मतदान प्रक्रियेत सक्रिय सहभाग असलेल्या बीएलओंचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान पत्र व पुष्पगुच्छ देऊन याप्रसंगी सन्मान करण्यात आला.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here