जळालेल्या कारमधे आढळला महिला डॉक्टरचा मृतदेह

नाशिक : पत्नी बेपता असल्याबाबत पोलिसात मिसींग दाखल केल्यानंतर नाशिक महापालिकेच्या वैद्यकीय अधिका-याचा मृतदेह जळालेल्या कारमधे आढळून आल्यानंतर खळबळ माजली आहे. काल रात्री वाडीव-हे गावानजीक एका कारला आग लागल्याचे समजल्यानंतर पोलिस पथकाने घटनास्थळी धाव घेतली होती. जळीत कारमधे एका महिलेचा मृतदेह आढळून आला होता. अधिक तपासाअंती सदर मयत महिला नाशिक महापालिकेतील कंत्राटी वैद्यकीय अधिकारी सुवर्णा वाजे असल्याचे निष्पन्न झाले.

मंगळवारी उशिरा रात्रीपर्यंत डॉ. सुवर्णा वाजे काम आटोपून घरी परत आल्या नव्हत्या. त्यामुळे बांधकाम व्यावसायिक असलेल्या त्यांच्या पतीने त्यांना मोबाईलवर मॅसेज केला होता. आपण कमात असुन वेळ लागेल असा त्यांना पलिकडून मॅसेज आला होता. मात्र त्यानंतर त्यांचा मोबाईल बंद झाला व त्या घरी देखील आल्या नाही. त्यामुळे त्या बेपत्ता झाल्याबाबत पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानंतर जळीत कारमधे त्यांचा मृतदेह आढळून आला. हा अपघात आहे की घातपात याबाबत उलटसुलट चर्चा सुरु आहे.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here