चाळीसगावला घरफोडी प्रकरणी गुन्हा

jain-advt

जळगाव : चाळीसगाव शहरातील मालेगाव रस्त्यावर असलेल्या सीआरपीएफ जवानाच्या घरात घरफोडी झाल्याचे उघड झाले आहे. सोने चांदीचे दागिने व रोकड असा एवज लंपास केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

योगेश सिताराम सुर्यवंशी हे सीआरपीएफ जवान असून ते मालेगाव रस्त्यावर रामकृष्ण नगर परिसरात राहतात. 20 ते 26 जानेवारी दरम्यान त्यांचे बंद घर असल्याचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घरात घरफोडी करत सोने चांदी व रोख रक्कम गायब केला आहे. 20 ग्रॅम सोन्याचे मंगळसुत्र, 7 ग्रॅम सोन्याची अंगठी, 3 भार वजनाच्या चांदीच्या दोन साखळ्या, आणि रोख रक्कम असा एवज चोरी झाल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे.कॉ.किशोर सोनवणे या घटनेचा पुढील तपास करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here