अश्लील नृत्य बघणा-या उपसरपंचासह सोळा अटकेत

jain-advt

नागपूर : नागपुरच्या उमरेड तालुक्यातील ब्राह्मणी या गावात लावणीच्या नावाखाली अश्लिल नृत्याचा कार्यक्रम पाहणा-या उप सरपंचासह सोळा जणांना  अटक  करण्यात आली आहे. यापैकी बारा जणांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. अवघ्या शंभर  रुपयात मंडपात  सुरु असलेल्या या  कार्यक्रमाची व्हिडीओ क्लिप सर्वत्र प्रसारीत झाली होती. या घटनेनंतर  खळबळ माजली. 

याप्रकरणी ब्राह्मणी येथील उपसरपंच रितेश आंबोने याच्यासह सोळा जणांना  अटक करण्यात  आली.  त्यातील बारा जणांची न्यायालयीन कोठडीत रवानगी झाली आहे. या घटनेप्रकरणी उमरेड  येथील पोलिस निरिक्षक यशवंत  सोलसे यांची बदली करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here