‘निवडणूकीसाठी उमेदवार पत्नी हवी’-बॅनर लावणाऱ्याविरुद्ध गुन्हा

jain-advt

औरंगाबाद : औरंगाबाद मनपाच्या निवडणूकीत उमेदवारी दाखल करण्यासाठी “उमेदवार बायको हवी” अशा आशयाचे बॅनर लावणा-याविरुद्ध क्रांती चौक पोलिस स्टेशनला गुन्हा नोंद करण्यात आला आहे. रमेश विनायकराव पाटील (35), रा. दलालवाडी औरंगाबाद असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. या बॅनरमुळे संतप्त झालेल्या भाजप महिला मोर्चाने सदर बॅनर फाडून घोषणाबाजी करत आपला निषेध व्य्क्त केला. सामाजिक कार्यकर्ते प्रशांत साठे यांनी देखील राज्य महिला आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे.

तिन मुले असल्यामुळे पदवीधर रमेश पाटील यास निवडणूक लढवता येत नसल्यामुळे त्याने ही बॅनरबाजी केली. लॉकडाऊन कालवधीत आपल्या पदरी तिसरे मुल पडल्याचे तो सांगतो. दुस-या लग्नाबाबत आपल्या पत्नीची तक्रार नसल्याचे देखील तो सांगतो. तिन मुले असल्यामुळे आपल्याला निवडणूक लढवता येत नसल्याची खंत असलेल्या रमेश पाटील याने बॅनरबाजी केल्याने तो चर्चेत आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here