बेपत्ता पोलिसाचा मृतदेह आढळला विहिरीत

औरंगाबाद : सहा दिवसांपूर्वी घराबाहेर गेलेले पोलिस नाईक संजय फकीरराव गाडे (50) यांचे शव रविवारच्या सायंकाळी पोलिस आयुक्तालय परिसरात असलेल्या विहिरीत आढळून आले. या घटनेने परिसरात खळबळ माजली आहे.

पोलिस मुख्यालयात कर्तव्यावर असलेले संजय गाडे यांनी तणावातून आत्महत्या केली असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. पडेगावात राहणा-या गाडे यांच्या पश्चात तीन मुले, पत्नी असा परिवार आहे. त्यांचा एक मुलगा पोलिस आहे. बेगमपुरा पोलिस स्टेशनला त्यांच्या बेपत्ता होण्याबाबत नोंद करण्यात आली होती. खेळणा-या मुलांचा विहिरीत गेलेला फुटबॉल आणण्यासाठी गेलेल्या मुलांच्या निदर्शनास शव आल्यानंतर आत्महत्येचा प्रकार उघडकीस आला.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here