महिलेचे खासगी फोटो व्हायरल? – शिवसेना पदाधिकाऱ्यांवर गुन्हा

नवी मुंबई : नवी मुंबई येथील दोघा शिवसेना पदाधिकाऱ्यांविरुद्ध खारघर पोलीस स्टेशनला विनयभंगाचा गुन्हा दाखल  करण्यात आला आहे. वडघर येथील घरकाम  करणा‌-या महिलेने याप्रकरणी तक्रार  दिली आहे. शिवसेनेचे रायगड जिल्हा सल्लागार बबन पाटील आणि खारघर शिवसेनेचे माजी शहर प्रमुख शंकर ठाकूर अशी  गुन्हा  दाखल  झालेल्या दोघांची नावे  आहेत.

तक्रारदार महिलेचे तिच्या एका मित्रासोबत असलेले खाजगी फोटो बबन पाटील आणि शंकर ठाकूर यांनी सोशल मिडीयावर  व्हायरल केल्याचा या महिलेचा आरोप  आहे. याप्रकरणी जाब विचारण्यासाठी गेल्यानंतर गलिच्छ भाषेत बोलून आपल्याला धक्काबुक्की केली असे महिलेचे म्हणणे आहे. शिवसेना जिल्हा सल्लागार बबन पाटील यांनी तक्रारदार महिलेचे आणि तिच्या मित्राचे फोटो बॅनरवर लावण्याची धमकी दिल्याचा  देखील आरोप महिलेने केला आहे. अद्याप कुणालाही अटक करण्यात  आलेली नाही.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here