पोलिसावर बलात्काराचा आरोप- गुन्हा दाखल

औरंगाबाद : विभक्त रहात असलेल्या विवाहीतेला लग्नाचे आमीष दाखवत बलात्कार केल्याप्रकरणी छावणी पोलिस स्टेशनला कार्यरत पोलिस शिपायाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संदीप लक्ष्मण पवार असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या पोलिस कर्मचा-याचे नाव आहे. पतीसोबत वाद झाल्यामुळे विभक्त राहणा-या विवाहीतेला दोन मुले असून ती नोकरी करते. गेल्या वर्षी एका मॉलमधे नोकरीला असतांना तिची पोलिस कर्मचारी संदीप पवार सोबत ओळख झाली असे तक्रारदार महिलेचे म्हणणे आहे.

पुढे दोघांचे एकमेकांवर प्रेम जडले. दोन्ही मुलांचा स्विकार करण्यासह लग्नाचे आमिष दाखवत तिच्यावर अत्याचार केल्याचे विवाहीतेने फिर्यादीत म्हटले आहे. 15 फेब्रुवारी 2021 ते 29 जानेवारी 2022 दरम्यान हा प्रकार घडला. 28 ऑगस्ट रोजी वैद्यकीय तपासणीत विवाहीता सहा आठवड्यांची गर्भवती असल्याचे दिसून आले. त्यामुळे तिने त्याच्याकडे लग्नाचा तगादा लावला. त्यानंतर तिचा गर्भपात केला असल्याचे देखील पिडितेने म्हटले आहे. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक पांडुरंग भागिले करत आहेत.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here