शिवसैनिक सुनील डिवरे हत्या प्रकरणी एक अटकेत

यवतमाळ : जुन्या वादातून यवतमाळ कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक तथा शिवसैनिक सुनील डिवरे यांची गुरुवारच्या रात्री गोळ्या झाडून तसेच धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली होती. या हत्येप्रकरणी पोलिसांनी चौघा संशयीतांना ताब्यात घेतले होते. त्यानंतर आणखी एकाला अटक करण्यात आली असुन अटकेतील संशयीतांची संख्या आता पाच झाली आहे. सूरज मनवर (30) रा. भांबराजा असे अटक करण्यात आलेल्या संशयीत तरुणाचे नाव आहे. यापूर्वी वैभव सोननकर (23), पवन सोननकर (25), रोहीत भोपळे (21) आणि सुरेश पाथरीकर सर्व रा. भांबराजा, यवतमाळ अशंना अटक झाली आहे.

यवतमाळ तालुक्यातील भांबराजा येथील यवतमाळ कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक आणि शिवसैनिक सुनील डिवरे यांची जुन्या वादातून हत्या करण्यात आली होती. याशिवाय त्यांची पत्नी व मुलाला मारहाण देखील झाली होती. इतर फरार दोघांचा शोध पोलिस पथकाकडून सुरु आहे. पुढील तपास पोलिस निरिक्षक किशोर जुनघरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here