चार मिनिटात पोहोचले पोलिस, वाचली लाखोची रक्कम

जालना :  जालना शहरातील मामा चौक भागात रात्री दिडच्या सुमारास एचडीएफसी बॅंकेचे एटीएम फोडण्याचा लुटारुंनी  प्रयत्न केला. मात्र लुटारुंच्या प्रयत्नादरम्यान सायरन वाजून तसा मेसेज बॅक अधिका-याला मिळाला. बॅंक  अधिका-याने तातडीने तशी माहिती पोलिस नियंत्रण कक्षाला दिली.

नियंत्रण कक्षाने लागलीच सदर बाजार पोलिसांच्या पथकाला पुढील माहिती दिली. या  चार मिनिटांच्या  कालावधीत पोलिस घटनास्थळी  पोहोचले व लाखो रुपयांची  एटीएम मधील रोकड सुरक्षित राहिली. एवढी मोठी  घटना होऊन देखील बॅंकेचा कुणी अधिकारी तक्रार देण्यासाठी समोर आलेला नाही. बॅकेने सुरक्षा रक्षक  देखील नेमलेला नाही.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here