एसएसडी फुड्स कंपनीत चोरी करणा-या तिघांना अटक

jain-advt

जळगाव : एमआयडीसी परिसरातील एसएसडी फुड्स कंपनीत चोरी करणा-या इतर तिघा आरोपींना अटक करण्यात आली आहे. या कंपनीच्या आवारातून 1 व 2 जानेवारीच्या दरम्यान 41 हजार रुपये किमतीच्या मशिनरी साहित्याची चोरी झाली होती. याप्रकरणी किशोर कटारीया यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार एमआयडीसी पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या गुन्ह्याच्या तपासात पोलिसांच्या अभिलेख्यावरील आरोपी दिनकर उर्फ पिन्या रोहीदास चव्हाण (22) रा. मच्छी मार्केट, सुप्रीम कॉलनी, जळगाव यास अटक करण्यात आली होती. त्याच्या ताब्यातुन 21 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला होता. त्याच्या इतर साथीदारांचा शोध सुरु होता. उर्वरीत आरोपीतांचा शोध घेत असतांना पो.ना. सुधीर सावळे यांना रात्र गस्ती दरम्यान संशयीत आरोपी राकेश गोकुळ राठोड (19) रा. सदगुरु सोसायटी, गणपती नगर, जळगाव मु. रा. सांगवी तांडा, ता. चाळीसगाव जि. जळगाव, किरण खुशाल रंगडे (35), रा. खेडी बु. ता. जि. जळगाव व सुशील विनोद कोळी (21) रा. तुळजाई नगर, पाण्याच्या टाकीजवळ, कुसुंबा ता. जि. जळगाव असे तिघे संशयास्पदरित्या शहरात फिरत असल्याची माहिती समजली. याप्रकरणी पो.नि.प्रताप शिकारे यांना माहिती देण्यात आली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली तिघांना शिताफीने एमआयडीसी परीसरातुन ताब्यात घेत अटक करण्यात आली. तिघांना न्यायालयात हजर केले असता 9 फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली. अटकेतील आरोपींकडून गुन्हयातील उर्वरीत मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. त्यांच्याकडून अजुन गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अटकेतील आरोपी सराईत गुन्हेगार असुन त्यांच्यावर यापूर्वी देखील गुन्हे दाखल आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here