सोनसाखळी चोरांचे वर्चस्व नव्याने वाढले !— महिलेचे मंगळसुत्र ओढून तिलाच दाखवले!!

जळगाव : महिलेच्या गळ्यातील मंगळसुत्र मोटारसायकवरील अज्ञात तरुणाने जबरीने ओढून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेप्रकरणी महिलेच्या तक्रारीनुसार एमआयडीसी पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शितल संजय रोकडे या गृहिणी इश्वर कॉलनी भागात राहतात. 9 फेब्रुवारी रोजी सायंकाळी त्या आपल्या नातेवाईकांना भेटण्यासाठी वर्षा कॉलनीत गेल्या होत्या. परतीच्या वेळी रात्री सव्वा आठच्या सुमारास ईश्वर कॉलनी परिसरातील उर्दू शाळेनजीक त्यांच्याजवळ मोटार सायकवर दोन अनोळखी इसम आले. मागे डबलसिट बसलेल्या इसमाने त्यांच्या गळ्यातील 35 हजार रुपये किमतीचे मंगळसुत्र बळजबरी ओढून हिसकावले. त्यानंतर आठवडे बाजाराच्या दिशेने दोघे मोटारसायकलने भरधाव वेगाने निघून गेले. जात असतांना मागे बसलेल्या इसमाने हिसकावलेले मंगळसुत्र शितल रोकडे यांना हात उंच करुन दाखवले. या घटनेप्रकरणी एमआयडीसी पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरु आहे.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here