डीआयजी – फैजपूर पोलीस पथकाच्या कारवाईत गावठी कट्टयासह आरोपी ताब्यात

jain-advt

जळगाव : नाशिक परिक्षेत्र विशेष पोलिस महानिरीक्षक आणि फैजपूर पोलिसांच्या संयुक्त कारवाईत गावठी कट्टयासह एकास अटक करण्यात आली आहे. विशाल प्रकाश पाचपांडे (23) रा.गंगाराम प्लाँट म्युन्सीपल हायस्कुल मागे भुसावळ असे अटक करण्यात आलेल्या कट्टा खरेदीदार आरोपीचे नाव आहे. पार उमर्टी ता.वरला जि.बडवाणी (मध्यप्रदेश) येथील शिकलकर नामक तरुणाकडून त्याने कट्टा घेतला होता. या प्रकरणी फैजपूर पोलिस स्टेशनला आर्म अँक्टनुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे. अटकेतील आरोपीस फैजपूर पोलिसांच्या ताब्यात पुढील कारवाईकामी देण्यात आले आहे.

या कारवाईत 25 हजार रुपये किमतीचा गावठी कट्टा, एक हजार रुपये किमतीचा एक राउंड, 30 हजार रुपये किमतीची गुन्ह्यात वापरलेली मोटर सायकल असा एकुण      56 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. स.पो.नि. सिध्देश्वर आखेगांवकर, सहायक फौजदार बशिर तडवी, हे.कॉ.रामचंद्र बोरसे, पोलिस नाईक मनोज दुसाने, राजेश ब-हाटे, पोलिस नाईक किरण चाटे, चेतन महाजन, उमेश सानप आदींनी कारवाईत सहभाग घेतला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here