इराणी टोळीला ताब्यात घेण्यात नाशिक पोलिसांना यश

नाशिक : दरोडा टाकण्याच्या इराद्याने येवला परिसरात आलेल्या इराणी टोळीला जेरबंद करण्याकामी नाशिक ग्रामीण एलसीबीसह येवला तालुका पोलिसांच्या संयुक्त कामगीरीला यश आले आहे. ताब्यातील इराणी टोळीकडून घातक हत्यारांसह दहा लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

मनमाड येवला मार्गावरील तांदुळवाडी फाट्यावर असलेल्या लॉन्ससमोर 9 तारखेच्या रात्री नाकाबंदी सुरु होती. दरम्यान दरोडा टाकण्याच्या उद्देशाने इराणी टोळी येणार असल्याची माहीती पो.नि.हेमंत पाटील यांना समजली. त्यामुळे नाकाबंदी अजून तिव्र स्वरुपात करण्यात आली.

हे देखील वाचा – मलायकाच्या अदा बघून प्रेक्षक घायाळ http://crimeduniya.com/?p=16860

वाहनांच्या तपासणीदरम्यान सिकंदर अली यावर अली(38) गेवराई बीड, अलीखान अफजल खान (30) रा.नेहरु नगर अकोट जिल्हा अकोला, रावत अली बहुमायू अली(38) रा.अशोक नगर झोपडपट्टी अकोला सुधीर सिद्धार्थ कांबळे(30) अशोक नगर अकोला अशा सर्वांना अटक करण्यात आली. हे सर्वजण दरोडा टाकण्याच्या इराद्याने आले होते. त्यांच्याकडून दोन्ही वाहनांसह एकुण 10 लाख 47 हजार 380 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here