जालन्यात व्यावसायिकाची पन्नाल लाख रुपयात फसवणूक

जालना : बांधकाम व्यवसायात गुंतवणूक केल्यास चांगला नफा मिळेल असे खोटे आमिष दाखवत परिचितानेच  व्यावसायीकाला पन्नास लाख रुपयात फसवल्याची घटना उघडकीस आली आहे. जालना येथील व्यावसायीक जवाहर शंकरलाल डेम्बडा यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार सदर बाजार पोलिस स्टेशनला गुन्हा नोंद करण्यात आला आहे. बांधकाम व्यवसायाला सध्या चांगले दिवस आले असून पैसे कमावण्याचे आमिष महेंद्र अग्रवाल यांनी जवाहर डेम्बडा यांना दाखवले. त्या आमिषाला बळी पडून जवाहर डेम्बडा यांनी सुरुवातीला 25 लाख रुपये गुंतवले. त्यानंतर जमीन खरेदी करण्याचे सांगून आणखी पंचवीस लाख मागितले. ते देखील डेम्बडा यांनी अग्रवाल यांना दिले.   

मात्र, बरेच दिवस निघून गेल्यानंतर देखील जमीनीचा व्यवहार झालाच नाही. दरम्यान कोरोनामुळे अग्रवाल यांचे निधन झाले. त्यामुळे व्यवहाराच्या वेळी हजर असलेले गिरधारी अग्रवाल यांची भेट घेत विचारणा केली. त्यांनी तुमचे पैसे जमीन मालकाकडे अडकले असल्याचे सांगत उडवाउडवीची उत्तरे देण्यास सुरुवात केली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर गिरधारी अग्रवाल, मयत महेंद्र अग्रवाल व त्यांची पत्नी अशाविरुद्ध सदर बाजार पोलिस स्टेशनला गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास सुरु आहे.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here