आरटीआय कार्यकर्त्यावर गोळीबार – गुन्हा दाखल

नाशिक : नाशिकचे माहिती अधिकार कार्यकर्ता तथा आरपीआय पदाधिकारी प्रशांत जाधव यांच्यावर उपेंद्रनगर परिसरात काल रात्री गोळीबार झाला. या जीवघेण्या हल्ल्यात ते बचावले असून अंबड पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

उपेंद्रनगरचे आरपीआय तथा माहिती अधिकार कार्यकर्ता प्रशांत जाधव हे रस्त्यावर उभे होते. दरम्यान मोटार सायकलवर आलेल्या दोघांनी त्यांच्या दिशेने गोळीबार केला. या घटनेत प्रशांत जाधव यांच्या मांडीला गोळी लागली व दुसरी पोटाला स्पर्श करुन गेली. या हल्ल्यात त्यांचा जीव वाचला असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. अंबड पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक भगीरथ देशमुख यांनी आपल्या सहका-यांसह घटनास्थळी धाव घेत पुढील कारवाई केली.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here