तरुणाचा दगडाने ठेचून केला खून

धुळे : शिरपुर तालुक्यातील निमझरी परिसरात तरुणाची दगडाने ठेचून हत्या झाल्याची घटना बुधवारी उघडकीस आल्याने खळबळ माजली आहे. संजय भोंग्या पावरा (30) रा. सामाऱ्यापाडा ता. शिरपूर असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे.

मयत संजय पावरा हा शिरपूर येथील एका हॉटेलमधे कामाला होता असे समजते. कामावरुन परत येत असतांना वाटेत त्याचा कुणाशीतरी वाद झाला. त्या वादातून झालेल्या झटापटीत त्याला फरफटत नेऊन डोक्यात दगड घालून हत्या केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या घटनेची माहिती समजल्यानंतर  शहर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख, स.पो.नि. गणेश फड, महिला पोलिस उप निरीक्षक छाया पाटील यांनी घटनास्थळी धाव घेत पुढील तपास व कारवाई सुरु केली. पुढील तपास सुरु आहे.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here