सतरा वर्षाच्या मुलासोबत महिला फरार!—- अल्पवयीन मुलाला करते आपली शिकार

अकोला : प्रेम आंधळे असते असे म्हटले जाते. मात्र असले आंधळे प्रेम कधी कधी प्रमाणापेक्षा अधिक आंधळे होऊन  बसते. प्रेमात आंधळा झालेल्य स्त्री अथवा पुरुषाला कसलेही भान रहात नाही. अशीच एक घटना अकोला शहरात उघडकीस आली आहे. अल्पवयीन सतरा वर्षाच्या मुलगा व पतीने सोडून वेगळी रहात असलेली महिला असे दोघे जण एकाचवेळी बेपत्ता झाले होते. तपासानंतर महिलेविरुद्ध पोस्को कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सतरा वर्षाच्या मुलावर प्रेम जडलेल्या महिलेला तिच्या पतीने सोडून दिल्यामुळे ती वेगळी राहते. तिची बहिण व बहिणीचा पती असे दोघे वारले असून त्यांच्या नऊ वर्षाच्या मुलाचा सांभाळ करण्याची जबाबदारी या महिलेवर आहे. असे असतांना देखील ती नऊ वर्षाच्या मुलाला सोडून सतरा वर्षाच्या मुलाला सोबत घेत पसार झाली. मुलाच्या आईवडीलांनी आणि महिलेच्या घरमालकाने दोघांच्या बेपत्ता होण्याची खबर अनुक्रमे खदान आणि एमआयडीसी पोलिस स्टेशनला नोंद केली. काही दिवसांनी मुलगा घरी परत आला. त्यानंतर महिलेचा देखील शोध लागला. सुरुवातीला बाल कल्याण समितीकडे हे प्रकरण गेल्यानंतर महिलेविरुद्ध बाललैंगिक अत्याचार कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला.   

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here