भुसावळ सहायक अधिक्षक ते पोलिस महासंचालक- रजनीश शेठ ठरले दुर्जनांचे कायदेशीर महासंहारक

जळगाव (क्राईम दुनिया न्युज नेटवर्क): महाराष्ट्राचे नवनियुक्त पोलिस महासंचालक रजनिश शेठ यांचे जळगाव जिल्ह्यातील भुसावळ शहरासोबत ऋणानुबंध आहेत. सन 1988 च्या बॅचचे रजनीश शेठ यांनी प्रोबेशन कालावधी पुर्ण केल्यानंतर पहिली पोस्टींग भुसावळ उप विभागात सहायक पोलिस अधिक्षकपदी मिळवली होती. 31/11/1990 ते 30/11/1991 या कालावधीत त्यांची भुसावळ शहरातील कारकिर्द गाजली. भुसावळ येथील प्रथम पोस्टींग पुर्ण झाल्यानंतर त्यांची अकोला येथे बदली झाली होती.

साधारण 32 वर्षाचा काळ लोटला तरी भुसावळकर जनता त्यांना विसरलेली नाही. रजनीश सेठ भुसावळला असतांना त्याकाळात भुसावळ शहरात मोजकेच पत्रकार होते. त्यापैकी सध्याचे सरकारी वकील अ‍ॅड. नितीन खरे यांचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते. अ‍ॅड. नितीन खरे हे त्याकालावधीत दैनिक जनशक्तीचे भुसावळ प्रतिनिधी होते. त्यानंतर लवकरच त्यांनी “दैनिक नवाकाळ”ची देखील धुरा सांभाळली होती.

भुसावळचे तत्कालीन सहायक पोलिस अधिक्षक तथा डीवायएसपी व सद्यस्थितीत राज्याचे पोलिस महासंचालक असलेले रजनीश शेठ यांनी त्याकाळात भुसावळ शहरातील कायदा व सुव्यवस्था चोखपणे हाताळली.  सहायक पोलिस अधिक्षक ते पोलिस महासंचालक या पोलिस दलातील प्रवासात भुसावळ हे त्यांचे पहिले स्टेशन होते. ते राज्याचे पोलिस महासंचालक झाल्याने निश्चितच भुसावळकर जनतेच्या दृष्टीने हा चर्चेचा विषय आहे. आरपीडी रस्त्यावरील डीवायएसपी बंगल्यात त्यांचा रहिवास होता. भुसावळ शहरातील पोलिस दलाच्या वास्तूंमधे अनेक बदल झाले. मात्र डिवायएसपी बंगल्याच्या जागेत मात्र अद्याप बदल झालेला नाही. ज्या शासकीय वास्तूत सध्या डिवायएसपी सोमनाथ वाघचौरे रहात आहेत त्याच बंगल्यात सुमारे 32 वर्षापुर्वी राज्याचे नवनियुक्त पोलिस महासंचालक रजनीश शेठ रहात होते. या वास्तूत पोलिस दलातील अनेक हस्ती राहून गेल्या आहेत. तत्कालीन डीवायएसपी दीपक जोग हे देखील त्यापैकी एक आहेत.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here