पोलिस कर्मचा-याची गडचिरोलीत गोळी झाडून आत्महत्या

मलकापूर : मलकापूर येथील मुळ रहिवासी असलेल्या पोलिस कर्मचा-याने गडचिरोली जिल्ह्यात स्वत:वर पिस्टलची गोळी झाडून आत्महत्या केली आहे. प्रमोद चांगदेव शेगोकार असे आत्महत्या करणा-या पोलिस कर्मच-याचे नाव आहे. प्रमोद शेगोकार हा अहेरी पोलिस स्टेशनला कार्यरत होता.   

आत्महत्या करणारा पोलिस कर्मचारी प्रमोद शेगोकार हा मलकापूर शहरातील पंतनगर परिसरातील रहिवासी होता. रविवार 20 फेब्रुवारीच्या रात्री ड्युटीवर हजर असतांना त्याने आत्महत्या का केली याचे कारण अद्याप समोर आलेले नाही. पुढील तपास सुरु आहे. मयत प्रमोद याच्यावर आज अंत्यसंस्कार होत आहे.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here