मित्राच्या मदतीने शालकांनी केली मेहुण्याची हत्या

अमरावती : वलगाव येथील दर्यापूर रस्त्यावर पाल ठोकून राहणाऱ्या तरुणाची त्याच्या दोघा शालकांनी मित्राच्या साथीने हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. तिघे संशयीत फरार असून वलगाव पोलिसांचे पथक त्यांच्या मागावर आहे. कन्हैय्या शंकर पवार (21) रा. अकोट ह. मु. वलगाव, दर्यापूर मार्गावर असे मयताचे तर बिशन रघुनाथ शिंदे, राजेश रघुनाथ शिंदे आणि किसना भोसले असे फरार संशयीत आरोपींचे नाव आहे.

कन्हैया व त्याची पत्नी गंगाबाई हे काही दिवसांपुर्वी अकोट येथून वलगाव परिसरात खेळणी विकण्यासाठी व राहण्यासाठी आले होते. दर्यापुर मार्गावर ते पाल ठोकून मुक्कामाला होते. गंगाच्या दोघा भावांचा आणि मयतचा त्याठिकाणी आपसात आधीच्या एका घटनेला अनुसरुन वाद झाला होता. त्या वादातून तिक्ष्ण हत्याराच्या हल्ल्यात कन्हैयाचा मृत्यु झाला. घटनेनंतर तिघे फरार झाले आहेत. या घटनेप्रकरणी वलगाव पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास सुरु आहे.  

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here