लक्झरी बसच्या चाकाखाली आल्याने मोटारसायकलस्वार ठार

जळगाव :  जळगाव शहरातून जाणा-या महामार्गावर अजिंठा चौफुलीजवळ आज सायंकाळी लक्झरी बसच्या धडकेत मोटारसायकलस्वार चाकाखाली आल्याने मृत्युमुखी पडल्याची घटना घडली आहे. विनय रामचंद्र खडके असे मृत्युमुखी पडलेल्या मोटार सायकलस्वार प्रौढाचे नाव आहे. याप्रकरणी लक्झरी बस चालकाविरुद्ध एमआयडीसी पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विजय फतरु सुरळकर असे बेदमुथा ट्रॅव्हल्सच्या खासगी बसवरील चालकाचे नाव आहे.

विनय रामचंद्र खडके (सोपानदेव नगर अयोध्या नगर जळगाव) हे दररोज आपल्या मोटार सायकलने पारोळा येथील कुटीर रुग्णालय पारोळा येथे नोकरीला जातात. नेहमीप्रमाणे ते पारोळा येथील कामकाज आटोपून जळगावला सायंकाळी परत आले होते. सायंकाळी घरी पोहोचण्याच्या बेतात असतांना त्यांच्यावर काळाने घाला घातला. त्यांना जखमी अवस्थेत सामान्य रुग्णालयात दाखल  केले असता डॉक्टरांनी त्यांना मयत घोषित केले.   

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here