चोरट्यांची माहिती देणा-यास पोलिसांकडून मिळणार बक्षीस

जळगाव : चाळीसगाव शहरात झालेल्या चो-यांच्या पार्श्वभुमीवर चोरट्यांची माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. चोरट्यांची माहिती देणा-यास योग्य ते बक्षीस दिले जाणार असून माहिती गुप्त ठेवली जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे. शहर पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस निरिक्षक सागर ढिकले यांच्याशी संपर्क साधून माहिती असल्यास द्यावी असे आवाहन करण्यात आले आहे. चाळीसगाव शहर पोलिसांनी चोरट्यांची माहिती मिळवण्यासाठी आमिषरुपी लोभाचे जाळे फेकले आहे. आपला दरारा दाखवणा-या पोलिस निरीक्षकांनी चोरट्यांचा तपास आपल्या कर्मचा-यांच्या बळावर तातडीने करुन दाखवावा अशी चाळीसगावकर नागरीक अपेक्षा बाळगून आहेत.

चाळीसगाव शहरात स्टेशन रोडवरील पुष्पराज गारमेंटस या दुकानातून रोख रक्कम व कपडे असा मुद्देमाल चोरी झाला आहे. याशिवाय मालेगाव रस्त्यावरील ईकॉम एक्स्प्रेस या कुरीयर कार्यालयातील दुकानाच्या कपाटातील 1 लाख 6 हजार रुपयांची रक्कम चोरट्यांनी चोरुन नेली आहे. गणेश कॉम्पलेक्स समोर असलेल्या द्वारका मेडीकल दुकानातून 7 लाख रुपयांचा मुद्देमाल देखील चोरट्यांनी लंपास केला आहे.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here