30 लाखाचा गांजा दोंडाईचात हस्तगत – तिघे फरार

jain-advt

धुळे : डीआयजी पथक नाशिक परिक्षेत्र आणि दोंडाईचा शहर पोलिस यांच्या संयुक्त कारवाईत दोंडाईचा शहरातून तब्बल 336 किलो गांजा पकडण्यात आला आहे. या गांजाचे बाजारमुल्य 30 लाख 26 हजार 790 रुपये एवढे आहे.

या कारवाईदरम्यान तिघे संशयीत फरार झाले असून त्यातील एकाचे नाव निलेश राजु मराठे रा. शिवराय चौक दोंडाईचा जिल्हा नंदुरबार असे निष्पन्न झाले आहे. त्याच्यासह त्याचे दोघे साथीदार फरार होण्यात यशस्वी झाले आहे. पोलिस पथक तिघा आरोपींच्या मागावर आहे. या कारवाईत दोंडाईचा पोलिसांसह डीआयजी पथकातील पोलिस निरीक्षक बापू रोहोम, स.पो.नि. सचिन जाधव (शिर्डी शहर वाहतुक शाखा), सहायक फौजदार रामचंद्र बोरसे (पोलिस मुख्यालय जळगाव), पोलिस नाईक प्रमोद मंडलिक, हे.कॉ. सचिन धारणकर, कुणाल मराठे, पो.कॉ. सुरेश टोंगारे आदींनी सहभाग घेतला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here