आयटी कंपनीतील तरुणीची एक लाखात ऑनलाईन फसवणूक

जळगाव : एटीएम कार्ड हरवल्याची तक्रार केल्यानंतर पलीकडून मोबाईलवर बोलणा-या व्यक्तीला तरुणीने एटीएम कार्डाची गोपनीय माहिती दिली. त्यानंतर तिच्या बॅंक खात्यातून डेबीट व क्रेडीट कार्डच्या माध्यमातून सुमारे एक लाख रुपयांची वजावट झाली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तरुणीने एमआयडीसी पोलिस स्टेशनला अज्ञात व्यक्तीविरुद्ध तक्रार दाखल केली आहे.

पुणे येथील आयटी कंपनीत काम करणारी जळगाव शहरातील तरुणी वर्क फ्रॉम होम करत आहे. दोन हजार रुपये घेण्यासाठी तरुणी पांडे चौकातील एयु स्मॉल बॅंकेच्या एटीएम सेंटरवर गेली. दोन हजाराची रक्कम घेतल्यानंतर घाईगर्दीत एटीएम कार्ड मशीनमधेच राहून गेल्याचे घरी आल्यानंतर तरुणीच्या लक्षात आले. त्यामुळे तिने एका जणाला एटीएम कार्डाचा शोध घेण्यासाठी एटीएम मशीनकडे रवाना केले. मात्र ते कार्ड तेथे नव्हते. त्यामुळे तरुणीने एटीएम कार्ड ब्लॉक करण्यासाठी कस्टमर केअर सर्व्हिसचा मोबाईल क्रमांक गुगलवर सर्च केला. त्या क्रमांकावर फोन लावला असता तो बिझी येत होता. काही वेळाने पलीकडून तरुणीला फोन आला. पलीकडून बोलणा-याने आपण आयसीआयसीआय कस्टमर केअर मधून बोलत असल्याचे सांगितले. मोबाईलमधे अ‍ॅनी डेस्क नावाचे अ‍ॅप डाऊनलोड करण्यास सांगण्यात आले. त्यानंतर पलीकडून बोलणा-याने तरुणीला एटीएम कार्डशी संबंधीत सर्व गोपनीय क्रमांक विचारले. ते तरुणीने विश्वास ठेवत पलीकडून बोलणा-या व्यक्तीला सांगितले. त्यानंतर खात्यातून पैसे कमी होत असल्याचा मेसेज तरुणीला तिच्या मोबाईलवर आला. बॅलन्स अपडेट होत असल्याचे पलीकडून बोलणा-याने तरुणीला सांगत असतांनाच इकडे डेबीट व क्रेडीट कार्डमधून एकुण 90 हजार 545 रुपये वजा झाले. रात्र बरीच झाली असल्यामुळे तरुणीने दुस-या दिवशी बॅंकेत जावून आपली व्यथा कथन केली. तुमची फसवणूक झाली असून तुम्ही पोलिस स्टेशनला तक्रार करा असे तरुणीला बॅंकेत सांगण्यात आले. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरु आहे.    

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here