पत्नीवर उपचार करणा-या डॉक्टर तरुणीची छेड

औरंगाबाद : पत्नीवर उपचार करणा-या डॉक्टर तरुणीची छेड काढणा-या प्रौढाविरुद्ध अवघ्या 48 तासातच न्यायालयात दोषारोपपत्र सादर करण्यात आले आहे. कर्करोगाने ग्रस्त पत्नीचे उपचारानंतर निधन झाल्यानंतर देखील निम्म्या वयाच्या डॉक्टर तरुणीचा पाठलाग करत त्रास देण्याचे काम प्रौढाकडून सुरुच होते. कन्हैय्या वसंतराव टाक (51) असे दोषारोपपत्र दाखल करण्यात आलेल्या संशयीत आरोपीचे नाव आहे. 

उपचारानंतर पत्नीचे निधन झाले तरी विविध बहाण्याने कन्हैयाचे दवाखान्यात जाण्याचे काम सुरुच होते. दवाखान्यात गेल्यानंतर तो डॉक्टर तरुणीची छेड काढतच होता. अखेर डॉक्टर तरुणीने सीटी कोतवाली पोलिस स्टेशनला कन्हैय्या टाक विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल केला. त्याला लागलीच अटक व 48 तासात त्याच्याविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र देखील दाखल करण्यात आले.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here