तलवार खरेदी करण्यासाठी गेलेल्या विद्यार्थ्यांना अटक

औरंगाबाद : दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने ऑर्डर देऊन तलवारी खरेदी करण्यासाठी गेलेल्या कॉलेजच्या दोघा विद्यार्थ्यांना सिडको पोलिसांनी रंगेहाथ ताब्यात घेत अटक केली आहे. तलवार विक्रेता मात्र फरार होण्यात यशस्वी झाला आहे. नौशाद खान असद खान (19) आणि विश्वेश राजेश सिद्धेश्वर (19) अशी अटकेतील विद्यार्थी आरोपींची नावे आहेत.

सिडको पोलिस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाला मिळालेल्या माहितीनुसार दोघा तरुणांना अटक करण्यात आली आहे. मेडिकव्हर रुग्णालय परिसरात दोघे महाविद्यालयीन तरुण तलवारी विकत घेण्यासाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना समजली होती. त्या माहितीच्या आधारे पोलिस निरीक्षक संभाजी पवार, विठ्ठल पोटे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने रविवारी सापळा रचला. अटकेतील विश्वेश याच्यावर यापूर्वी गुन्हा दाखल आहे. दोन्ही तलवारी पोलिसांनी जप्त केल्या आहेत. पोलिस उपनिरीक्षक अशोक अवचार, हवालदार प्रकाश डोंगरे, विशाल सोनवणे, विनोद गिरी, सागर शिरसाट, अमोल शिंदे, संदीप बिल्लारी आदींच्या पथकाने या कारवाईत सहभाग घेतला.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here