नाशिकला प्राचार्यांकडून विद्यार्थ्याला काठीने मारहाण?

नाशिक रोड : वर्गातील खिडकीची काच विद्यार्थ्याने फोडल्याचा आरोप करत प्राचार्यांनी विद्यार्थ्याला काठीने मारहाण केल्याप्रकरणी उप नगर पोलिस स्टेशनला तक्रार दाखल करण्यात आली आहे. दरम्यान आपण मारहाण केली नसल्याचे प्राचार्यांचे म्हणणे आहे. खिडकीची काच फुटल्यामुळे नुकसान भरपाई म्हणून पालकांकडून पाच हजार रुपयांची मागणी करण्यात आल्याचे व विद्यार्थ्याच्या आईचा मोबाईल हिसकावून घेण्यात आल्याचे पालकांचे म्हणणे आहे.

जेलरोड येथील स्कॉटिश अकॅडमीच्या शाळेत घडलेल्या या घटनेप्रकरणी कैलास बबनराव ढिकले यांनी उप नगर पोलिसात प्राचार्य रमादेवी रेड्डी यांच्याविरुद्ध तक्रार देण्यात आली आहे. वर्गातील खिडकीची काच फुटल्याने विद्यार्थ्यांला काठीने मारहाण, पालकांकडून पाच हजार रुपयांची नुकसान भरपाईची मागणी व विद्यार्थ्याच्या आईचा मोबाईल हिसकावून घेतल्याचा आरोप पालकांकडून करण्यात आला आहे. तक्रारकर्ता कैलास बबनराव ढिकले हे विद्यार्थी यशराज ढिकले याचे काका आहेत. यशराजच्या हातावर, पाठीवर व मांडीवर काठीने मारहाण केल्याचे वळ दिसून आले आहे.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here