श्रीगोंद्यात पोलिस कर्मचाऱ्याला अटक

अहमदनगर : किरकोळ गुन्ह्यात अटक न करण्याच्या बदल्यात लाचेची मागणी करणा-या पोलिस कर्मचा-यास अहमदनगर एसीबी पथकाने अटक केली असून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संजय काळे असे लाचेची मागणी करणा-या श्रीगोंदा पोलिस स्टेशनमधील कार्यरत पोलिस कर्मचा-याचे नाव आहे.

तक्रारदाराच्या भावाची अटक टाळण्यासह आरोपीला मदत करण्याकामी संजय बबन काळे (32) याने तक्रारदारास विस हजार रुपयांची मागणी केली होती. तडजोडीअंती सतरा हजार देण्याघेण्याचे निश्चित झाले. लाच मागीतल्याचे निश्चीत झाल्यामुळे त्याच्याविरुद्ध कारवाई करण्यात आली. संजय काळे याच्याविरुद्ध यापुर्वी देखील सन 2017 मधे तोफखाना पोलिस स्टेशनला कार्यरत असतांना लाचेप्रकरणी कारवाई झालेली आहे.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here