सॉफ्टवेअर इंजिनिअर तरुणीला लाखो रुपयात ऑनलाईन गंडा

jain-advt

जळगाव : मोबाईलवर आलेला ओटीपी कुणालाही शेअर करु नका असे बॅंकाकडून वेळोवेळी आवाहन केले जात असते. भोळेभाबडे लोक या आवाहनाकडे दुर्लक्ष करत फसतात. मात्र अनेक सुशिक्षीत देखील ओटीपी शेअर करुन आपली फसवणूक करण्याची दुस-याला संधी देत असतात. जळगाव शहरातील सॉफ्टवेअर इंजीनिअर तरुणीने देखील पलीकडून मंजुळ आवाजात बोलणा-या मोबाईल धारक तरुणीस ओटीपी सांगून आपली लाखो रुपयात फसवणूक करुन घेतल्याचे उघड झाले आहे.

शहरातील पंचमुखी हनुमान मंदिर परिसरात राहणारी तरुणी पुणे येथील कंपनीत सॉफ्टवेअर इंजीनिअर पदावर कामाला आहे. गेल्या दोन महिन्यापासून तिने आयसीआयसीआय बॅंकेचे क्रेडीट कार्ड घेतले आहे. 7 मार्च रोजी सदर तरुणीला तिच्या मोबाईल क्रमांकावर क्रेडीट कार्ड सवलत हवी का अशी पलीकडून बोलणा-या तरुणीने विचारणा केली. क्रेडीट कार्ड सवलत हवी असल्यास पन्नास हजार रुपयांचे बिल पाठवते असे तिला पलीकडून बोलणा-या तरुणीने सांगितले. हळूहळू पलीकडून बोलणा-या तरुणीने गोड बोलून सॉफ्टवेअर इंजीनीअर तरुणीच्या मोबाईलवरील सर्व स्टेप्स माहिती करुन घेतल्या. त्यानंतर मोबाईलवरील ओटीपी विचारुन घेतला. ओटीपी सांगितल्यानंतर तरुणीच्या मोबाईलवर 1 लाख 97 हजार 897 रुपयांचे बिल आले. सदर रक्कम तिच्या बॅंक खात्यातून विविध रकमांच्या स्वरुपात वजा झाल्या. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तरुणीने एमआयडीसी पोलिसात तक्रार दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here