हरवलेले – चोरी झालेले मोबाईल मुळ मालकांना परत

jain-advt

जळगाव : जळगाव जिल्ह्यातील विविध पोलिस स्टेशन हद्दीतून चोरी झालेले अथवा गहाळ झालेले मोबाईल तपासाअंती हस्तगत करत मुळ मालकांना पोलिस अधिक्षकांच्या हस्ते परत देण्यात आले आहेत. जळगाव पोलिस दलाच्या मंगलम सभागृहात आयोजीत कार्यक्रमात एकुण 44 मोबाईल त्यांच्या मुळ मालकांना परत मिळाल्याने त्यांनी पोलिस दलाचे आभार मानले आहे.

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांनी या तपासकामी एक पथक नियुक्त केले होते. माहितीचा स्त्रोत आणि तांत्रिक माहितीच्या आधारे जळगाव जिल्ह्यातून जप्त करण्यात आलेल्या मोबाईलची अंदाजे किंमत 8 ते 10 लाख रुपये आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here