जळगाव शहरात खूनाची दुसरी घटना

crimeduniya
[email protected]

jain-advt

जळगाव : जळगाव शहरात काही तासांच्या अंतराने खूनाची दुसरी घटना उघडकीस आली आहे. एका हत्येचा जेमतेम तपास लागला असतांना जळगाव शहरातील शिवाजीनगर हुडको परिसरात खूनाची दुसरी घटना उघडकीस आल्याने खळबळ माजली आहे.

नरेश आनंदा सोनवणे (28) असे दुस-या घटनेतील हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. तिक्ष्ण हत्याराने हत्या झालेल्या या घटनेप्रकरणी सुरुवातीला जळगाव शहर पोलिस स्टेशनला आज दुपारी चारच्या सुमारास अकस्मात मृत्युची नोंद घेण्यात आली असून लवकरच खूनाचा गुन्हा दाखल होणार असल्याचे समजते. या घटनेची माहिती समजताच पो.नि. विजयकुमार ठाकुरवाड यांच्यासह त्यांच्या सहका-यांनी घटनास्थळ गाठले. या घटनेतील मारेक-याच्या शोधार्थ विविध पथके रवाना झाली आहेत. हत्येचे कारण अद्याप समजले नसून लवकरच या हत्येचा उलगडा देखील होणार असल्याचे म्हटले जात आहे. पो.नि.विजयकुमार ठाकुरवाड यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील विजयसिंग पाटील, अश्रफ शेख, रवी नरवाडे, राजेश मेंढे, संजय हिवरकर आदी आरोपीचा कसून शोध घेत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here