शालकाने केली मेहुण्याची हत्या

jain-advt

अमरावती : पती-पत्नीच्या वादात मध्यस्ती करण्यासाठी आलेल्या शालकाने लाकडी राफ्टर मारुन बहिणीच्या पतीची हत्या केल्याप्रकरणी गाडगे नगर पोलिस स्टेशनला खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अजय सुखदेव मोहोड (46) रा. पोलिस वसाहत अमरावती असे मयताचे तर अमोल काशीनाथ जवंजाळ (35) असे संशयीत मारेक-याचे नाव आहे. संशयीत आरोपी अमोल जवंजाळ हा मयताचा शालक आहे. 26 मार्चच्या रात्री गाडगे नगर पोलिस स्टेशन हद्दीतील पोलिस कर्मचारी वसाहतीत सदर घटना घडली.

अजय मोहोड यांची पत्नी ग्रामीण पोलिस स्टेशनला कार्यरत आहे. शनिवारी रात्री मयत अजय व त्यांच्या पत्नीचा वाद सुरु होता. त्यानंतर काही वेळाने अजयच्या पत्नीने तिचा भाऊ अमोल जवंजाळ यास घरी बोलावले. अमोल जंवजाळ बहिणीच्या घरी पोलिस वसाहतीत आला त्यावेळी पती पत्नीत वाद सुरु होता. त्यावेळी अमोलने अंगणातील लाकडी राफ्टर घेऊन अजयच्या डोक्यावर मारले. त्यानंतर रुग्णालयात नेत असतांना अजयचा मृत्यु झाला. पोलिस उपायुक्त विक्रम साळी, सहायक पोलिस आयुक्त पुनम पाटील, गाडगेनगरचे ठाणेदार आसाराम चोरमले, एएसआय दयाशंकर तिवारी यांच्यासह पोलिस पथक घटनास्थळी दाखल झाले. अमोल जवंजाळविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यास अटक करण्यात आली आहे. पुढील तपास सुरु आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here