परळीत दोन लाखांचा गुटखा जप्त

jain-advt

परळी : परळी शहरात पोलिसांनी दोन ठिकाणी केलेल्या छापेमारीत सुमारे दोन लाख रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला असून चार गुटखा व्यावसायिकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुभाष चौकातील राघव एंटरप्रायझेस आणि विद्यानगरात वैभव बुरांडे यांच्याकडे हे छापे टाकण्यात आले आहेत. रविवार 27 मार्च रोजी पोलिस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या पथकाने केलेल्या या कारवाईने गुटखा व्यावसायीकांमधे खळबळ माजली आहे. एकुण 2 लाख 11 हजार 853 रुपयांचा गुटखा या कारवाईत जप्त करण्यात आला आहे.

सुभाष चौक परिसरातील राधेश्याम मुरलीधर लाहोटी यांच्या राघव एंटरप्रायझेस या किराणा दुकानातून 80 हजार 943 रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला. या प्रकरणी राधेश्याम मुरलीधर लाहोटी, रौफ लाला, फेरोज पठाण यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान दुस-या कारवाईत शहरातील विद्यानगर भागातील वैभव विश्वनाथ बुरांडे यांच्या घरातून 1 लाख 30 हजार 910 रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला. त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here